हिंदुस्थान-नेपाळदरम्यान पहिली पेट्रोलियम पाइपलाइन सुरू, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिंदुस्थाननेपाळदरम्यानच्या पहिल्या क्रॉस बॉर्डर पेट्रोलियम पाइपलाइनचे उद्घाटन केले. बिहारमधील मोतिहारी आणि नेपाळमधील अमलेखगंज अशी ही पाइपलाइन आहे. मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्यासह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचे उद्घाटन केले.

या पाइपलाइनचे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. दोन्ही देशांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे शक्य झाले. हिंदुस्थानने नेहमीच नेपाळबरोबर सहकार्याचा हात समोर केला आहे. 2015 च्या विनाशकारी भूकंपानंतर  नेपाळमधील गोरखा आणि नुवाकोट जिल्हय़ांमध्ये घरप्रकल्प उभारण्याचे काम हिंदुस्थानने केले, असे नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या