India-Pakistan Tension – Emergency च्या वेळी ऑन करा हा मोबाईल अलर्ट, अशी करा सेटिंग

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. हिंदुस्थानची कारवाई पाकड्यांच्या जिव्हारी लागली आहे. अशातच महाराष्ट्रात आज मॉकड्रील घेतले जाणार असून ठिकठिकाणी सायरन वाजवले जाणार आहे. ज्यामुळे आपल्याला युद्धाची माहिती मिळू शकेल. दरम्यान, अशा आपत्कालीन परिस्थितीत तुमचा स्मार्टफोन तुमच्यासाठी कसा उपयुक्त ठरू शकतो. आपल्या मोबाईलफोनचा वापर करून युद्धाबाबत अचूक माहिती कशी मिळवावी याबाबत आपण जाणून घेऊया….

युद्धजन्य किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सरकारकडून अलर्ट जारी केला जातो. हा अलर्ट प्रत्येकाच्या फोनमध्ये वाजू लागतो. मात्र, यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये एक विशिष्ट सेटींग करणे आवश्यक आहे. बहुतेक लोकांना माहिती असेल की फोनमध्ये एक उपयुक्त फीचर आहे जे आपत्कालीन परिस्थितीत अलर्ट देते. परंतु अजूनही असे बरेच लोक आहेत ज्यांना या फीचरची माहितीही नाही…

Emergency Alert सेटिंग
1. मोबाईल फोनमधील सेटिंग ऑप्शन ऑन करा
2. सेफ्टी अॅण्ड एमर्जंन्सी ऑप्शनवर क्लिक करा
3. यानंतर वायरलेस इमरजेंसी अलर्ट्स हा ऑप्शन दिसेल, त्यावरक्लिक करा
4. यानंतर Allow Alerts, Test Alerts यासारखे ऑप्शन दिसतील त्यांना ऑन करा

आज 7 मे रोजी सर्व राज्यांना ब्लॅकआऊट आणि मॉकड्रीलचे निर्देश दिले आहेत. यावेळी सायरन वाजवला जाणार आहे. एअर रेड सायरनचा वापर हवाई हल्ला किंवा क्षेपणास्त्र हल्ल्यासारख्या धोक्यांबद्दल जनतेला सतर्क करण्यासाठी केला जातो. हा सायरन नैसर्गिक आपत्तींच्या वेळी देखील सक्रिय असतो. साधारणपणे सायरन सुमारे 60 सेकंद वाजतो. 7 मे रोजी होणाऱ्या मॉकड्रीलचाही स्मार्टफोनवर अलर्ट मिळू शकतो.