
पाकिस्तानकडून आजही 26 ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. सायंकाळनंतर पाकिस्तानी सैन्याकडून श्रीनगर विमानतळासह अवंतीपुरा हवाई तळावर ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले तर जम्मू-कश्मीरच्या 6 सेक्टर उरी, तंगधार, केरन, मेंढर, नौगाम आणि पूंछ येथे अंदाधुंद फायरिंग केली. त्याचबरोबर पंजाबच्या फिरोजपूरमध्ये नागरी वस्तीवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रs डागली. त्यात एका घराला आग लागून तीनजण होरपळले.
जम्मू आणि दक्षिण कश्मीरमध्ये अनेक ठिकाणी स्पह्टांचे आवाज ऐपू आल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले. संपूर्ण जम्मू आणि कश्मीरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला होता. जम्मू, सांबा आणि पठाणकोट जिह्यातही ड्रोन हल्ले झाले. हे ड्रोन पाडण्यात आल्याचे लष्करी अधिकाऱयांनी सांगितले. तर श्रीनगरमध्ये मशिदीच्या लाऊडस्पीकरवरून नागरिकांना लाईट्स बंद ठेवण्याचे आणि सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. उधमपूर आणि नगरोटा येथेही ड्रोन हल्ला झाला.