शुभवार्ता!सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, रेल्वे भरणार 10 हजार पदे

रेल्वेत नोकरीची वाट पाहणाऱया तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्ड, पूर्व रेल्वे आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी यांनी मिळून तब्बल 10 हजारांहून अधिक पदे भरण्यासाठी कंबर कसली आहे. दहावी उत्तीर्ण अधिक एनसीव्हीटी मान्यताप्राप्त आयटीआयमधून शिक्षण ते बीएस्सी पदवीधारक, बीई, बीटेक असे शिक्षण घेतलेल्यांना अर्ज करता येणार आहे. www.rrcer.org या संकेतस्थळावर अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

 आरसीसी पूर्व रेल्वे अॅप्रेंटिस एपूण 3 हजार 115 जागा असून दहावी उत्तीर्ण आणि एनसीव्हीटी मान्यताप्राप्त आयटीआय शिक्षण पूर्ण केलेल्यांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. 14 ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

 आरसीसी ईआर लेव्हल-2 या पदासाठी 13 जागा आहेत. यात लेव्हल 1 साठी या पदासाठी 10 वी उत्तीर्ण आणि आयटीआय तसेच एनएसी हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱयांना संधी आहे.

 आरआरबी टेक्निशियनसाठी तब्बल 6 हजार 238 पदांची भरती करण्यात येणार आहे. यात टेक्निशियन ग्रेड-1 (सिग्नल) या पदासाठी एकूण 183 जागा आहेत. तर टेक्निशियन ग्रेड 3 या पदासाठी 6 हजार 55 जागा आहेत.

 आयसीएफ अॅप्रेंटिस या पदासाठी चेन्नईमध्ये भरती प्रक्रिया होणार आहे. 1 हजार 10 पदे असून उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असायला हवा. 11 ऑगस्ट ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.