मोठी बातमी: पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी अटारी सीमा केली खुली

अटारी वाघा बॉर्डरवर बीएसएफ, पंजाब पोलीस आणि हवाई दलाचा कडक बंदोबस्त

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने काही मोठे निर्णय घेतले होते. ज्यामध्ये हिंदुस्थानने पंजाबमधील अटारी सीमा वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कोणत्याही नागरिकांना अटारी मार्गे हिंदुस्थानात येणे अथवा हिंदुस्थानातून पाकिस्तानात जाण्याची परवानगी नव्हती. मात्र आता हिंदुस्थान सरकारने एक निर्णय घेतला असून पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परतण्यासाठी अटारी सीमा खुली करून दिली आहे.

पुढील आदेशापर्यंत अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परतण्याची परवानगी देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशात 30 एप्रिल रोजी सीमा बंद ठेवण्याच्या मागील निर्देशात बदल करण्यात आला आहे.