
हिंदुस्थानने पाकिस्तानवर तिसरा वॉटर स्ट्राईक केला असून चिनाब नदीवर बांधलेल्या रियासी येथील सलाल आणि बगलिहार धरणाचे दरवाजे आज उघडले. त्यामुळे पाकव्याक्त कश्मीरवर पुराचे संकट घोंघावत आहे. एकीकडे ऑपरेशन सिंदूरचा तडाखा तर दुसरीकडे पूरस्थिती यामुळे शेतीही संकटात असून पाकिस्तानचा आर्थिक कणाच मोडून पडण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
मुसळधार पावसामुळे हिंदुस्थानने रामबन येथील बागलिहार धरणाचा दरवाजा उघडला. सिंधू जल करार स्थगित झाल्यामुळे आता या धरणांमधून किती पाणी सोडायचे हे सर्वस्वी हिंदुस्थानच्या हातात आहे. यापूर्वी हिंदुस्थानने चिनाब नदीतील पाणी रोखले होते. सलाल आणि बागलिहार धरणातून पाणी का सोडण्यात आले याचे कारण हिंदुस्थानने दिलेले नाही. परंतु, अचानक पाणी सोडल्याने पीओकेतील नागरिकांच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे येथील जनतेत सरकारविरोधात उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तापमानात घट, रोगराई वाढणार
जम्मू-कश्मीरमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस धाला. त्यामुळे सलाल आणि बगलिहार या धरणांमध्ये मोठया प्रमाणावर पाणी जमा झाले. त्यानंतर या दोन्ही धरणांवरील सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. पीओकेत पूरस्थितीमुळे रोगराई वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, रामबन जिह्यातील चंबा सेरी येथे भूस्खलन झाल्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून अनेक प्रवासी अडकले आहेत.