
तेल कंपन्यांनी रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल कच्च्या तेलाची खरेदी निश्चित (Book) केली आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय हिंदुस्थानची दिलासा मानला जात आहे.
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक देशांसमोर संकट उभे ठाकले आहे. यातच हिंदुस्थानने रशियाशी असलेला आपला व्यापारी व्यवहार सुरू ठेवत मोठ्या प्रमाणात तेल साठा सुनिश्चित केला आहे. या ६ कोटी बॅरल तेलामुळे देशांतर्गत पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधन उत्पादनांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे. हिंदुस्थानी रिफायनरीजनी हा साठा आगामी काळातील मागणी लक्षात घेऊन आरक्षित केला आहे.
दरम्यान, मध्य पूर्वेतील युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेलाची वाहतूक जवळजवळ ठप्प झाली आहे. आपल्या तेलाच्या गरजांचा मोठा भाग आयात करणारा हिंदुस्थान पर्यायी पुरवठा शोधण्यासाठी वेगाने प्रयत्न करत आहे. यातच अमेरिकेने दिलेल्या सवलतीनंतर रशियासोबत हा मोठा व्यवहार करण्यात आला आहे.

























































