अमेरिकेने सैन्य मागे घेताच तुर्कीचा सीरियावर हल्ला, हिंदुस्थानची तीव्र प्रतिक्रिया

1276

अमेरिकेने (America) सैन्य मागे घेताच तुर्कीने (Turkey) एकामागोमाग एक सीरियावर (Syria) तुफान हल्ले चढवले आहेत. तुर्कीने कुर्दीश सैन्यावर जोरदार हल्ले केले आहेत. तुर्कीच्या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने (India) तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने तुर्कीच्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली असून दोन्ही देशांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने (Foreign ministry) तुर्कीला सीरियाच्या स्वातंत्र्याचा सन्मान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणताही वाद असेल तर तो चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करण्यात यावा. तुर्कीकडून उत्तर आणि पूर्व सीरियामध्ये होणारे बॉम्ब हल्ले चिंतेचा विषय आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियातून अमेरिकेचे सैन्या मागे बोलावण्याची काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. याच आठवड्यात मंगळवारी आणि बुधवारी सीरियाच्या काही भागातून अमेरिकेचे सैन्य मागे घेण्यात आले. यानंतर तात्काळ तुर्कीने तेथील कुर्दीश सैन्यावर हल्ला केला. तुर्कीचे राष्ट्रपती तैयप एद्रोगन यांनी ट्विटरद्वारे या हल्ल्याची घोषणाही केली होती.

तुर्कीच्या सैन्याने सीरियाच्या सैन्यासोबत मिळुन ऑपरेशन शांती सुरू केले आहे. याद्वारे दायशच्या दहशतवाद्यांना निशाणा बनवण्यात येत आहे. येथे शांतता राखण्यासाठी दहशतवाद्यांचा खात्मा आवश्यक असल्याचे ट्वीट एद्रोगन यांनी केले आहे. विशेष म्हणजे तुर्कीने ज्या कुर्दीश सैन्यावर हल्ला चढवला आहे त्यांनी सीरियामध्ये ईसीसविरोधात लढण्यासाठी अमेरिकन सैन्याची साथ दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या