आमच्या अखंडतेचा सन्मान राखा; हिंदुस्थानने ट्विटरला बजावले

हिंदुस्थानचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांचा नेहमी सन्मान राखा. तुमच्या लाईव्ह व्हिडिओत आमच्या देशाचा नकाशा दाखवताना त्याच्याशी केलेली छेडछाड आम्ही मुळीच सहन करणार नाही, अशा कडक शब्दांत केंद्र सरकारने सोशल साईट्स ट्विटरची कानउघाडणी केली आहे. लेहची भौगोलिक स्थिती दाखवताना ट्विटरने तो चीनचा भाग दाखवण्याची अक्षम्य चूक केली होती.

त्यामुळे हिंदुस्थानी नेटकऱयांनी ट्विटरवर कडक कारवाई करण्याची मागणी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडे केली होती. त्यानंतर हिंदुस्थानची भौगोलिक स्थिती दाखवताना भान ठेवा, पुन्हा आमचा भूभाग दुसऱया देशाचा असल्याचे दाखवल्यास आम्हाला तुमच्यावर कठोर कारवाई करावी लागेल, असे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय सहानी यांनी ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांना पत्र पाठवून बजावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या