ट्रम्प यांच्या 3 तासांच्या अहमदाबाद भेटीवर 100 कोटींची उधळपट्टी!

544
donald-trump

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 24 फेब्रुवारीला हिंदुस्थान दौऱयावर येत आहेत. या दौऱयाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातच्या अहमदाबादमधून होणार आहे. ट्रम्प यांच्यासाठी गुजरात सरकारने तिजोरीच उघडली असून अवघ्या तीन तासांच्या दौऱयासाठी तब्बल 100 कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे.

जगातील सर्वांत श्रीमंत देशाच्या राष्ट्रप्रमुखाला अहमदाबादेतील गरिबीचे दर्शन होऊ नये यासाठी विमानतळापासून होणाऱया रोड शोच्या रस्त्यालगतच्या झोपडय़ांसमोर मोठी भिंत उभारण्यात येत आहे.

अशी होणार उधळपट्टी
– 16 रस्त्यांचे डांबरीकरण सुरू केले आहे. मोटेरा स्टेडियम ते विमानतळ हा नवीन रस्ता तयार करण्यात येत आहे. रस्त्यांसाठी 60 कोटींचा खर्च होणार आहे.

– ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षेसाठी 15 कोटींचा खर्च होणार आहे.

– मोटेरा स्टेडियम येते ‘केम छो ट्रम्प’ कार्यक्रम होणार आहे. एक लाख लोकांच्या नाश्त्यासाठी 10 कोटी खर्च होतील. सांस्कृतिक कार्यक्रम, ट्रम्प यांची रॅली यासाठीही सुमारे 10 कोटी खर्च होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या