टप्प्यात येताच कार्यक्रम! अग्नी क्षेपणास्राची यशस्वी चाचणी, मारक क्षमता 2 हजार किलोमीटर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) अत्याधुनिक क्षेपणास्र क्षेत्रात प्रगती साधली आहे. अग्नी मालिकेच्या सहाव्या क्षेपणास्राची ओडिशातील बालासोर येथून अग्नी प्राईम या क्षेपणास्राची यशस्वी चाचणी केली आहे. अग्नी या क्षेपणास्राची मारक क्षमता 1 हजार ते 2 हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. संशोधकांच्या मते या रेल्वेमधून मोठ्या मालवाहू वाहनातून याची वाहतूक केली जाऊ शकते, हे विशेष आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे अग्नी या क्षेपणास्र हे कमी वजनाचे व लांब पल्ला गाठणारे आहे. हिंदुस्थानने 1989 मध्ये मध्यम श्रेणीच्या बॅलेस्टिक क्षेपणास्र अग्नी – 1 ची सर्वप्रथम चाचणी केली होती. अग्नी- 1 ची जागा आता अग्नी प्राइम घेईल, अग्नी क्षेपणास्राच्या मालिकेची यापूर्वी पाच क्षेपणास्रे हिंदुस्थानने यशस्वीपणे विकसित केली आहेत.

अग्नी प्राईमच्या चाचणीवेळी संरक्षण संशोधन व विकास संघटनेशी संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि वैज्ञानिकांचे एक पथक उपस्थित होते. येणाऱ्या काळात हिंदुस्थान आणखी अत्याधुनिक शक्तिशाली क्षेपणास्रांची चाचणी करण्याची शक्यता आहे.

शेजारील राष्ट्रातील सीमावाद व इतर प्रश्नांमुळे अनेक राष्ट्रांत शीतयुद्ध सुरू आहे. त्या पाश्वभूमीवर विदेशातील नवनवीन संशोधन व संरक्षण दलातील प्रगती पाहता क्षेपणास्रांच्या निर्मिती क्षेत्रात आता हिंदुस्थान पूर्णपणे स्वावलंबी झाला आहे. क्षेपणास्र तंत्रज्ञान किंवा इतर उपकरणांसाठी कोणत्याही इतर देशांवर अवलंबून राहत नाही. कोरोना महामारीच्या काळात सध्या अनेक प्रगतिशील राष्ट्रांत वादविवाद वाढले आहे. त्यामुळे अनेक राष्ट्र स्वत:ची साधनसामग्री वाढविण्याच्या तयारीत आहे.