हिंदुस्थानच्या स्वदेशी बनावटीच्या के- 4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; नौदलाचे सामर्थ्य वाढणार

369

हिंदुस्थानने स्वदेशी बनावटीच्या के-4 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. सुमारे 3500 किलोमीटर दूरपर्यंत लक्ष्यभेद करण्याची क्षमता क्षेपणास्त्रात आहे. तसेच ते शस्त्रा वाहून नेण्यातही सक्षम आहे. या चाचणीनंतर हिंदुस्थानी नौदलाचे सामर्थ्य वाढणार आहे. पाणबुडीमधून अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. चीनची राजधानी बीजिंगपासून पाकिस्तानातील सर्व शहरे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आली आहेत. हे क्षेपणास्त्र विकसीत करण्यासाठी दोन वर्षांपासून यासाठी प्रयत्न सुरू होते.

के-4 क्षेपणास्त्र पाणबुडीची चाचणी रविवारी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर करण्यात आली. समुद्राच्या पाण्यातून ही यशस्वी चाचणी करण्यात आली. स्वदेशात विकसित करण्यात आलेल्या दोन क्षेपणास्त्रांपैकी हे एक आहे. के-4 आणि क्षेपणास्त्र बिओ-5 ही ती क्षेपणास्त्र आहेत. याची क्षमता सुमारे 700 किलोमीटर आहे. हे क्षेपणास्त्र डीआरडीओने विकसित केले आहे. देशात बनवलेली अरिहंत क्लासची परमाणू पाणबुडीला तैनात करण्यात येणार आहे. हिंदुस्थानकडे आयएनएस अरिहंत परमाणू पानबुडी आहे. तर अन्य एका पानबुडीचा समावेश करण्यात येणार आहे. जमीन, हवा आणि पाण्यातून परमाणू क्षेपणास्त्राचा मारा करण्याची क्षमता ठेवणारा हिंदुस्थान जगातील सहावा देश ठरला आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीन या देशांसह हिंदुस्थानचाही त्यात समावेश झाला आहे.

सुमारे 3500 किलोमीटरपर्यंत मारा करू शकणाऱ्या या क्षेपणास्त्राची लांबी 12 मीटर आहे. त्याचा व्यास 1.3 मीटर आहे. त्याचे वजन 17 टन आहे. हे सुमारे 2000 किलोचे शस्त्र घेऊन जाण्यास सक्षम आहे. 20 मीटर खोल पाण्यात हल्ला करण्याची क्षमता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या