धोनीच्या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाची शरणागती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । दुबई

दुबईमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा यष्टीमागे आपल्या चपळाईचा नमुना सर्वांना दाखवला. धोनीच्या या चपळाईपुढे अफगाणिस्तानी फलंदाजाने शरणागती पत्करली. 200 सामन्यात कर्णधाराची धुरा सांभाळणाऱ्या धोनीने या सामन्यात जाडेजाच्या गोलंदाजीवर जावेद अहमदी याला यष्टीचित केले. यानंतर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर हसमातुल्लाह शाहिदी यालाही यष्टीचित करत चमकदार कामगिरी केली.

क्रिकेट हा कर्णधाराचा खेळ, प्रशिक्षकाचा नव्हे ; सौरभ गांगुलीचा शास्त्रींवर निशाणा
अन् धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कर्णधार

सुपर फोरच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या संघाने 50 षटकात 8 बाद 252 धावा केल्या. सलामीवीर मोहम्मद शहजादने 124 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून जाडेजाने सर्वाधिक 3, तर कुलदीपने 2 बळी घेतले. खलिल अहमद, दिपक चहर आणि केदार जाधवला प्रत्येकी एक बळी मिळाला