विराट-रोहित जोडीचा ‘रन’धमाका, टीम इंडियाकडून ‘कांगारू मर्दन’

रोहित शर्माचे दणकेबाज शतक… कर्णधार विराट कोहलीचे झुंजार अर्धशतक… मोक्याच्या वेळी श्रेयस अय्यरने केलेली फटकेबाजी… मोहम्मद शमीचे चार बळी… आणि रवींद्र जाडेजाने केलेल्या कंजूष गोलंदाजीच्या बळावर ‘टीम इंडिया’ने ऑस्ट्रेलियाला 7 गडी आणि 15 चेंडू राखून धूळ चारत मालिकाविजय साजरा केला. ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथची शतकी खेळी व्यर्थ ठरली. विराट कोहलीच्या सेनेने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 फरकाने बाजी मारली. सामनावीराची माळ रोहित शर्माच्या गळ्यात पडली, तर मालिकावीराचा बहुमान विराट कोहलीला मिळाला.

त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात डळमळीत झाली होती. डेव्हिड वॉर्नर (3) आणि कर्णधार ऍरोन फिंच (19) ही सलामीची जोडी लवकर तंबूत परतली. वॉर्नरने मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर यष्टीमागे लोकेश राहुलकडे झेल दिला, तर स्टिव्हन स्मिथच्या चुकीमुळे फिंच धावबाद झाला. स्मिथच्या शतकाने सावरले. फिंचला धावबाद करणाऱया स्मिथने शतक ठोकून आपल्याकडून झालेल्या चुकीचे उट्टे काढले. स्मिथने 132 चेंडूंच्या खेळीत 131 धावा करताना एका षटकारासह 14 चेंडू सीमापार पाठवले.

हाताला काळ्या पट्ट्या बांधून बापू नाडकर्णी यांना श्रद्धांजली

अखेरच्या कन-डे सामन्यात ‘टीम इंडिया’चे क्रिकेटपटू हाताकर काळी पट्टी लाकून मैदानाकर आले. हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे शुक्रकारी निधन झाले. त्यांना आदरांजली काहण्यासाठी हिंदुस्थानी खेळाडूंनी काळय़ा पट्टय़ा बांधल्या होत्या.

रोहित-विराटचा दणका

ऑस्ट्रेलियाकडून मिळालेले 287 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने 47.3 षटकांत 3 बाद 289 धावा करून पूर्ण केले. रोहित शर्मा (119) व लोकेश राहुल (19) यांनी 69 धावांची सलामी देत ‘टीम इंडिया’ला सावध सुरुवात करून दिली. ऍस्ट्रोन एगरच्या गोलंदाजीवर राहुल पायचित झाला. मात्र त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने (89) रोहितच्या साथीने दुसऱया गडय़ासाठी 137 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियन गोलंदाजी निप्रभ ठरवली. रोहितने 128 चेंडूंच्या खेळीत 6 टोलेजंग षटकार व 8 सणसणीत चौकारांसह आपली शतकी खेळी सजवली. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 217 डावांत 9 हजारांचा पल्ला पार करत सौरभ गांगुलीला मागे टाकले.

आपली प्रतिक्रिया द्या