हिंदुस्थान-न्यूझीलंड ‘अ’ सराव सामना ड्रॉ

370

हिंदुस्थान व न्यूझीलंड ‘अ’ यांच्यातील तीनदिवसीय सराव क्रिकेट सामना ड्रॉ झाला. हिंदुस्थानने या कसोटीत वर्चस्व गाजवताना पहिल्या डावात 28 धावांची आघाडी घेतली होती. याचबरोबर हिंदुस्थानने दुसऱया डावात 48 षटकांत 4 बाद 252 धावसंख्या उभारून फलंदाजीचा चांगला सराव करून घेतला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने पहिल्या डावात 78.5 षटकांत 263 धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरादाखल यजमान न्यूझीलंड ‘अ’ संघाचा पहिला डाव 74.2 षटकांत 235 धावसंख्येवर संपुष्टात आला. हिंदुस्थानने दुसऱया दिवसाच्या बिनबाद 59 धावसंख्येवरून रविवारी अखेरच्या दिवशी 4 बाद 252 धावसंख्येपर्यंत मजल मारल्यानंतर उभय संघांच्या कर्णधारांनी कसोटी बरोबरीवर सोडविण्याचा निर्णय घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या