दमदार शतकासह कोहलीची पॉन्टिंगशी बरोबरी

803
virat-kohli

दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध पुणे येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार विराट कोहलीने शतक ठोकत टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणलं आहे. त्याला अजिंक्य रहाणेने देखील चांगली साथ दिली असून अर्धशतकाच्या त्याने मजल मारली आहे. लंच टाईमपर्यंत टीम इंडियाच्या 367 धावा झाल्या होत्या.

कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक ठोकले. हे शतक विराटसाठी अत्यंत महत्त्वाचे शतक ठरले आहे. कारण तब्बल 10 डावांनंतर त्याने हे शतकी खेळी केली आहे. त्यामुळे हरवलेला सूर त्याला पुन्हा गवसला असून हे त्याच्या करिअरमधील 26 वे कसोटी शतक आहे. तर कर्णधार पदी असताना त्याने आतापर्यंत 19 शतकं झळकावली आहेत. याआधी त्याने डिसेंबर 2018 मध्ये पर्थ कसोटी सामन्यात शतक झळकावले होते.

दक्षिण आफ्रिके विरुद्ध पुणे येथे दुसऱ्या कसोटी दरम्यान खेळताना त्याने 173 चेंडूत शतक पूर्ण केले. ज्यामध्ये 16 चौकारांचा समावेश आहे.

2014 मध्ये महेंद्रसिंह धोनीकडून कर्णाधार पदाची धुरा विराटकडे आली. कर्णधार म्हणून काम करताना शतक झळवण्याची कामगिरी करण्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगची बरोबरी केली आहे. दोघांच्या नावावर आता 19-19 शतक आहेत. आफ्रिकेचा माजी कर्णधार स्मिथ 25 शतकं झळकावून पहिल्या क्रमांकावर आहे.

कसोटी कर्णधार पद आणि शतकं

25 शतकं – ग्रॅम स्मिथ
19 शतकं – रिकी पॉन्टिंग / विराट कोहली
15 शतकं – अॅलेन बॉर्डर / स्टीव्ह वॉ / स्टीव स्मिथ

आपली प्रतिक्रिया द्या