सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, व्हॉट्सअ‍ॅपचे केंद्र सरकारला उत्तर

666

गेल्या काही काळापासून व्हॉट्सअ‍ॅप कोणत्या नवीन फिचरमुळे नाही तर हेरगिरीच्या प्रकरणावरून चर्चेत आहे. इस्रायलच्या एका कंपनीने पिगासस स्पायवेअर सॉफ्टवेअर बनवून व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांची हेरगिरी केली आहे. यामध्ये हिंदुस्थानी पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्त्यांवर पाळत ठेवून हेरगिरी करण्यात आली असल्याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपनेच दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप हेरगिरीचा हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला होता. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे की, पेगाससने केलेल्या या हेरगिरीमुळे हिंदुस्थानातील 121 वापरकर्ते प्रभावित झाले आहेत. तसेच केंद्र सरकारने अशा व्यक्त केली आहे की, व्हॉट्सअ‍ॅप आपली सुरक्षा भिंत अधिक बळकट करेल. यापुढे अशी चूक खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा ही सरकराने व्हॉट्सअ‍ॅपला दिला आहे.

इस्रायलच्या एनएसओ सॉफ्टवेअर कंपनीने डिझाइन केलेल्या पिगासस या स्पायवेअरद्वारे जगातील चार खंडातील सुमारे 1400 व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांची हेरगिरी करण्यात आली होती. यानंतर हिंदुस्थानी सरकारने व्हॉट्सअ‍ॅपला याप्रकरणी स्पष्टीकरण मागितले होते. यावर व्हॉट्सअ‍ॅपने आपले स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, कंपनी सर्व प्रकारच्या सुरक्षा फळीवर काम करेल. तसेच कंपनीने सुरक्षेमधील या चुकीची दुरुस्ती केली असल्याचे म्हटले आहे. व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की, कंपनी या विषयावर सरकारबरोबर काम करेल.

आपली प्रतिक्रिया द्या