‘प्रायव्हसी पॉलिसी’त मनमानी चालणार नाही

व्हाॅट्सअॅपच्या नवीन ‘प्रायव्हसी पॉलिसी’वरून सुरू असलेल्या वादात केंद्र सरकारने उडी घेतली आहे. ‘प्रायव्हसी पॉलिसी’तील कोणत्याही प्रकारचा मनमानी, एकतर्फी बदल स्कीकारला जाणार नाही, असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानेव्हाॅट्सअॅपचे सीईओ किल कॅथकार्ट यांना पत्राद्वारे सुनावले आहे. पॉलिसीतील बदल तत्काळ मागे घ्या, अशी तंबीही दिली आहे. जागतिक पातळीवर हिंदुस्थानमध्येच व्हाॅट्सअॅपचे सर्वाधिक यूजर्स आहेत. हिंदुस्थानच व्हाॅट्सअॅपच्या सेवांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या पच्या सेवा-शर्ती आणि गोपनीयतेच्या धोरणांतील प्रस्तावित बदलांमुळे हिंदुस्थानी नागरिकांच्या निवडीच्या स्वातंत्र्याबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. हिंदुस्थानींचा योग्य आदर झाला पाहिजे. ऍपच्या प्रायव्हसी पॉलिसीतील मनमानी, एकतर्फी बदल स्वीकारला जाणार नाही, असे केंद्रीय मंत्रालयाने व्हाॅट्सअॅपच्या सीईओंना सुनावले आहे. व्हाॅट्सअॅपने इन्फर्मेशन प्रायव्पसी, प्रिडम ऑफ चॉईस आणि डाटा सिक्युरिटीसंबंधी आपल्या दृष्टीकोनाचा फेरविचार करावा, अशीही सूचना केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या