
नेपाळमध्ये पुरामुळे वीजनिर्मिती आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. नेपाळला दररोज 18 तास वीज निर्यात करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. 13 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत नेपाळला 654 मेगावॉटपर्यंत वीजपुरवठा करण्यात येणार आहे. नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे जलविद्युत प्रकल्पासह वीजनिर्मिती, वाहतूक आणि वितरण व्यवस्थेचे नुकसान झाले.


























































