हिंदुस्थानी संघाने रचला इतिहास, 22 पदकांसह सांघिक विजेतेपदाला गवसणी

हिंदुस्थानच्या बॉडीबिल्डर्सने उझबेकिस्तान येथील ताश्कंद येथे पार पडलेल्या जागतिक बॉडीबिल्डिंग आणि फिजिक स्पोर्टस् चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. पाच सुवर्ण, आठ रौप्य व नऊ कास्य अशा एकूण 22 पदकांवर मोहोर उमटवत सांघिक चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला. अशी कामगिरी हिंदुस्थानच्या संघाने पहिल्यांदाच करून दाखवली हे विशेष.

महाराष्ट्राच्या सुजनला रौप्य पदक

हिंदुस्थानने या स्पर्धेत 22 पदकांवर नाव कोरले. महाराष्ट्राकडून सुजन पिळणकर याने सीनियरमधील 90 किलो वजनी गटात रौप्य पदकाची माळ आपल्या गळ्यात घातली. या स्पर्धेत 23 देशांतील स्पर्धकांचा सहभाग होता. या स्पर्धेला दणदणीत प्रतिसादही लाभला.

आपली प्रतिक्रिया द्या