
स्मृती मानधनाच्या वेगवान आणि धडाकेबाज शतकी खेळीने हिंदुस्थानला 102 धावांचा खणखणीत विजय मिळवून दिला. या विजयामुळे तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थानी महिलांनी 1-1 अशी बरोबरी साधली असून आता मालिकेचा फैसला शनिवारी होणाऱ्या तिसऱ्या ललागेल.
पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानी संघाचा आठ विकेटनी ध्व्वा उडवला होता तर आज हिंदुस्थानी महिलांनी त्या पराभवाचा वचपा का102 धावांच्या विजयाची नोंद केली. हिंदुस्थानची आघाडीची फलंदाज स्मृती मानधनाच्या 117 धावांच्या खेळीच्या जोरावर 292 धावा केल्या होत्या तर ऑस्ट्रेलियाला या आव्हानाचा पाठलागही करता आला नाही. एलिसा हिली आणि जॉर्जिया वॉल या दोघी 12 धावांत बाद झाल्या. त्यानंतर एलिस पेरी आणि ऍनाबेल सदरलॅण्डने संघाच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न केले, मात्र यांच्या विकेट गेल्यानंतर ऑस्ट्रेलियन महिलांचा डाव 190 धावांतच आटोपला. क्रांती गौडने 28 धावांत 3 तर दीप्ती शर्माने 2 विकेट टिपत ऑस्ट्रेलियाचा डाव 41 षटकांतच संपवला.
मानधनाने रचला इतिहास
ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीने टॉस जिंकून गोलंदाजी घेतल्यानंतर मानधनाने 29 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. फक्त 77 चेंडूंत ठोकलेले हे शतक हिंदुस्थानसाठी वन डेतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वेगवान शतक ठरले. अव्वल क्रमांकावरही मानधनाच असून तिने याच वर्षी आयर्लंडविरुद्ध 70 चेंडूत शतक केले होते.