सुवर्ण मंदिरात हवाई संरक्षण तोफा तैनात नव्हत्या, हिंदुस्थानी लष्कराची माहिती

पाकिस्तानकडून सुवर्ण मंदिर लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, सुवर्ण मंदिरात हवाई संरक्षण तोफा तैनात नव्हत्या, अशी माहिती हिंदुस्थानी लष्कराने दिली आहे.  दरम्यान, हिंदुस्थानी लष्कराने सुवर्ण मंदिराशी संपर्क साधल्याची मला माहिती नाही.  मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुवर्ण मंदिराचे मुख्य ग्रंथी सिंग साहिब ग्यानी रघुबीर सिंग यांनी  केली आहे.

पहलगाम हल्ल्यातील पीडितांना शहीद दर्जा; याचिका फेटाळली

न्यायालय नवीन धोरणे बनवू शकत नाही, ते सरकारचे काम आहे, असे स्पष्ट करत पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने आज पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 26 जणांना शहीद दर्जा देण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळली. केंद्र सरकारनेही या याचिकेला विरोध केला होता. अशा मुद्दय़ांसाठी ही वेळ नाही, असे केंद्राने म्हटले होते.