
इंडियन बँकेत एकूण 350 पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज भरायला सुरुवात झाली असून अखेरची तारीख 11 एप्रिल 2026 पर्यंत आहे. भरती संबंधी सविस्तर माहिती बँकेची अधिकृत वेबसाइट indianbank.in वर देण्यात आली आहे. उमेदवारांकडे शैक्षणिक पात्रता बीई, बीटेक, एमसीए, सीए, सिव्हिल इंजिनीअर, आर्किटेक्टची पदवी असणे आवश्यक आहे. लेखी परीक्षा, मुलाखत, कागदपत्राची पडताळणीनंतर निवड केली जाईल.

























































