
2026 या वर्षात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण होणार आहेत. पहिले सूर्यग्रहण माघ अमावास्येच्या दिवशी मंगळवार, 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे. हे पंकणाकृती सूर्यग्रहण हिंदुस्थानातून दिसणार नाही. ते आफ्रिका खंडाचा दक्षिण प्रदेश, दक्षिण अमेरिकेचा दक्षिण प्रदेश, अंटार्क्टिका, अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर येथून दिसणार आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी 3 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण हिंदुस्थानात ग्रस्तोदित स्थितीत दिसणार आहे.

























































