क्रिकेटपटू करुण नायरने कोरोनावर केली मात

289

आपल्या कारकीर्दीतील पहिल्या कसोटी शतकाचे त्रिशतकामध्ये रूपांतर करणाऱया करुण नायर या हिंदुस्थानी क्रिकेटपटूने कोरोनावर मात केली असून आता तो आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब या संघासाठी खेळण्यास सज्ज होत आहे.

करुण नायर हा दोन आठवडय़ांपेक्षा जास्त कालावधीसाठी विलगीकरणात होता. त्यानंतर झालेल्या चाचणीमध्ये त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. आता किंग्ज इलेव्हन संघ व्यवस्थापनातर्फे यूएईला तातडीने प्रवास करण्याच्या प्रोटोकॉलचा भाग म्हणून करुण नायरच्या आणखी एकूण तीन वेळा कोरोना चाचण्या होतील. कोरोना चाचणी निगेटिव्ह येणारे खेळाडू आणि सहकारी वर्गातील सदस्यच 20 ऑगस्टनंतर यूएईला उड्डाण करू शकतील. करुण नायर बंगळुरूहून चार्टर विमानात चढणार आहे. तेथे एका छोटय़ा गट या चार्टर विमानाने प्रवास करत दिल्लीतील खेळाडू आणि कर्मचारी यांना विमानाने मुंबईला घेऊन येईल.

आपली प्रतिक्रिया द्या