अमेरिकेत हिंदुस्थानी चालकाने तीन गाड्यांना उडवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील इंडियाना या ठिकाणी पंजाबी ट्रक चालकाने तीन वाहनांना धडक दिली. या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. सुखदीप सिंग असे या ट्रक चालकाचे नाव असून तो अमेरिकेत सेमी ट्रक चालवण्याचे काम करत होता. सुखदीप सिंगच्या ट्रकने पिकअपला जोरात धडक दिल्याने 64 वर्षीय टेरी यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी सुखदीप सिंग अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत होता, अशीही माहिती आता समोर आली आहे. अमेरिकन पोलिसांनुसार, तो केवळ निष्काळजीपणे वाहन चालवत नव्हता, तर त्याची इमिग्रेशन स्थितीदेखील बेकायदेशीर आढळली. सध्या तो इमिग्रेशन अँड कस्टम्स एनफोर्समेंटच्या ताब्यात आहे.