इधर छोटा मगज होता है… पाश्चात्यांच्या तुलनेत हिंदुस्थानींचे मेंदू लहान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिमेकडील देशांतील नागरिकांच्या मेंदूच्या आकारमानाच्या तुलनेत हिंदुस्थानी नागरिकांच्या मेंदूचे आकारमान, लांबी, रुंदी, वजन कमी असते असे हैदराबाद येथे झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. संशोधनादरम्यान हैदराबाद आयआयटीने पहिल्यांदाच इंडियन ब्रेन एटलस तयार केले आहे.

हे संशोधन स्मृतीभ्रंश आणि मेंदूशी संबंधित आजारांवर आधारित आहे. या संशोधनातून मेंदूशी निगडित आजारावरील उपचारांना निश्चित दिशा मिळणार आहे. या संशोधनाचा अहवाल न्यूरॉलजी इंडिया नावाच्या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. हे संशोधन इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलजी, हैदराबादच्या संशोधकांनी केले आहे. या संशोधनाचे प्रमुख जयंती सिवास्वामी यांनी सांगितले आहे की हिंदुस्थानी नागरिकांच्या मेंदूचा आकार MINI च्या तुलनेतही लहान असतो. असे अनेक स्कॅन काढल्यानंतर ही बाब समोर आल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. यासाठी MRI ही करण्यात आले होते. तसेच मेंदूच्या आकारमानाशी संबंधित जे काही टेम्पलेड विकसित केले गेले त्यात चिनी आणि कोरियाई ब्रेन टेम्पलेट्सचाही समावेश आहे.