स्वातंत्र्यदिनी ‘जय जय वंदे मातरम्’ची सुमधुर भेट

331

1870 साली बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला यंदा 150 वर्षं पूर्ण झाली. याचे औचित्य साधून गायक डॉ. अतिंद्र सरकडीकर यांनी ‘जय जय कंदे मातरम्’ या गीताची निर्मिती केली आहे. कंदे मातरम् या गीताचं सौंदर्य तसेच महत्त्व अधोरेखित करणारे या गीताचे शब्द स्वत: डॉ. सरवडीकर यांनी लिहिले असून त्याला स्करसाजही चढवला आहे. त्यांनी प्रिया सरवडीकर यांच्या साथीने हे गीत गायलं असून येत्या 15 ऑगस्ट रोजी हे गीत यू-टय़ूबवर लाँच होणार आहे.

स्वातंत्र्य लढय़ात ‘वंदे मातरम्’ या गीताने अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली होती. देशभक्तांसाठी तर वंदे मातरम् हा जणू स्फूल्लिंग चेतवणारा मंत्र ठरला होता. ब्रिटिशांनी वंदे मातरम् गाण्यासाठी बंदी घातली होती. वंदे मातरम् गाणाऱयांना कठोर शासनही केले जाई. परंतु सगळे अत्याचार सहन वरून देशभक्त ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत असत. जाती, धर्म, भाषा, प्रांत, वर्ण यांच्या पलीकडे जाऊन वंदे मातरम् या गीताने संपूर्ण देशात एकोप्याची आणि देशभक्तीची भावना निर्माण केली होती. वंदे मातरम् गीताच्या याच महत्त्काच्या कार्याचं देशवासीयांना स्मरण करून देण्यासाठी ‘जय जय वंदे मातरम्’ या सुमधुर गीताची निर्मिती सरवडीकर यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या