
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबईत झालेल्या इंडियन ओपन पिकलबॉल स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडूंचेच वर्चस्व दिसून आले. हिंदुस्थानच्या कुणाल बारे याने हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन सचिन पाठारेसह शानदार कामगिरी करत दुसऱ्या इंडियन ओपन पिकलबॉल स्पर्धेत पुरुष दुहेरी गटाचे सुवर्ण पटकावले. चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीत त्यांनी हिंदुस्थानच्या निखिल राजपूत – निरज शर्मा यांचे तगडे आव्हान परतावले. त्याच वेळी मिश्र दुहेरी गटात हिंदुस्थानचा स्टार खेळाडू अतुल एडवर्ड याने अपेक्षित बाजी मारताना अमेरिकेच्या विविएन डेव्हिडसह सुवर्ण जिंकले. ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनच्या (एआयपीए) वतीने मालाड येथील गोरेगाव स्पोर्टस् क्लब येथे ही स्पर्धा पार पडली.



























































