आयपीएल रद्द

हिंदुस्थानातील कोरोनाच्या उद्रेकामुळे अखेर आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआय व आयपीएल गव्हार्ंनग समितीकडून मंगळवारी घेण्यात आला. कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपरकिंग्स या दोन संघांसह सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स या संघांतील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर आयपीएलला ‘ब्रेक’ लावण्यात आला.

सध्या ही स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली असली तरी आता उर्वरित लढती खेळवण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे हा मोसम रद्द झाल्यात जमा आहे असे म्हटले तरी चालेल. बीसीसीआयचे यामुळे तब्बल दोन हजार कोटींचे नुकसान होणार असून याचवेळी ऑक्टोबर – नोव्हेंबर या कालावधीत हिंदुस्थानात खेळवण्यात येणाऱया टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आयपीएल रद्द झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची मोठी अडचण झाली आहे. कारण हिंदुस्थानातून येणाऱया कुणालाच देशात प्रवेश न देण्याचा निर्णय ऑस्ट्रेलिया सरकारने घेतला आहे. त्यामुळे आयपीएलमधील ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आता मालदिवमध्ये आसरा घेण्याचे ठरवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या