भंगार विकून रेल्वे झाली मालामाल, कमावले 35 हजार कोटी

921

रद्दी आणि भंगार सामान विकून कोणी कोट्यवधी झाल्याचे तसे ऐकवत नाही. पण भारतीय रेल्वेने मात्र हीच रद्दी आणि भंगार सामान विकून कोट्यवधी रुपये कमावले आहेत. गेल्या दहा वर्षात या टाकाऊ सामानातून रेल्वेने एक, दोन नाही तर चक्क 35,073 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भंगारातून रेल्वेने कमावलेली ही रक्कम उत्तरेकडील तीन राज्यांच्या रेल्वेच्या वार्षिक बजेटहून अधिक आहे.

रेल्वेला मालामाल करणाऱ्या या भंगार सामानात कोचसह रेल्वे रुळ, जुन्या वॅगन्सचा समावेश आहे. यांच्या विक्रीतून रेल्वेने अपेक्षेपेक्षा जास्त कमावले आहे. ही रक्कम सिक्कीम, मिझोरम, आणि मणिपूर या राज्यांच्या 2018-19 च्या रेल्वे बजेटहूनही अधिक आहे.

मध्य प्रदेशमधील मालवा-निमर क्षेत्र विभागाने या आकड्याचा खुलासा केला आहे. भारतीय रेल्वेने 2011-12 साली रद्दी व भंगार सामान विकून 4,409 कोटी रुपये कमावले होते. तर 2016-17 साली हा आकडा 2,718 कोटीवर पोहचला. या भंगार सामानात रेल्वेरुळांची संख्या अधिक होती. हे पाहता गेल्या दहा वर्षात फक्त रेल्वे रुळांची विक्री करून रेल्वेने 11,938 कोटी रुपये कमावले आहेत.

याआधी पश्चिम रेल्वेने आपल्या यार्ड व स्टोरमध्ये जमा असलेली रद्दी विकून 517.41 कोटी रुपये कमावले होते. त्याआधी उत्तर रेल्वेने भंगारातून एवढी कमाई केली होती. पण त्याला पश्चिम रेल्वेने मागे टाकले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या