रेल्वे कर्मचारी कपातीची पहिली गाज रेल्वे बोर्डावर; 50 संचालकांची उचलबांगडी

371

रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याला रेल्वे खात्याने सुरुवात केली असून त्याची पहिली गाज रेल्वे मंडळाच्या संचालकांवर पडली आहे. रेल्वे मंडळावर असलेल्या 200 पैकी 50 संचालकांची उचलबांगडी करण्यात येणार असून त्यांना रेल्वेच्या विभागीय क्षेत्रात सामावून घेतले जाणार आहे.  बिरेक डिब्रॉय समितीने 2015मध्ये सरकारला अहवाल दिला होता. या अहवालानुसार रेल्वे बोर्ड आणि रेल्वे कर्मचाऱयांची संख्या जास्त असून ती कमी करण्याची शिफारस केली होती. रेल्वे मंडळ आणि कर्मचारी कपातीचा निर्णय गेले अनेक वर्षे प्रलंबित आहे. मंडळातील संचालक आणि इतर भागातील कर्मचारी एकसारखेच काम करत असल्यामुळे अशा अधिकारी, कर्मचाऱयांची आवश्यकता नाही. त्यांची संख्या कमी करून त्यांना इतर विभागात सामावून घेण्याचे निर्देश आहेत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही नुकत्याच राबवलेल्या 100 दिवस अजेंडाचा हा एक भाग असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, 2000 साली अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळातही रेल्वेच्या बोर्ड आणि कर्मचाऱयांची संख्या कमी करण्याची शिफारस केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या