आर्थिक विघ्न… रुपया घसरला, शेअर बाजारही 400 अंकानी पडला

74
rupee-dollar

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशभरात विरोधकांनी बंदची हाक दिलेली असतानाच रुपयाची घसरण सुरू आहे. सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीलाच रुपया आणि शेअर बाजार दोन्हीमध्ये पडझड पाहायला मिळाली आहे. डॉलरच्या तुलनेत आज रुपया 72.66 वर येऊन पोहोचला आहे. तर मुंबई शेअर बाजारही आपटला असून 414.40 अंकांची घसरण झाली. निफ्टीही 132.75 अंकानी खाली आला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरला मागणी प्रचंड वाढल्याने रुपयाची पडझड अजून काही दिवस सुरूच राहणार अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 414.40 अंकानी उतरून 37,975 वर पोहोचला आहे. तर निफ्टी 132.75 अंकानी घरून 11.456 वर पोहोचला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या