हिंदुस्थानी लघुपटाला ऑस्कर

17

सामना ऑनलाईन। लॉस एंजेलिस

ऑस्कर पुरस्कारात हिंदुस्थानी लघुपट ‘पीरियड एंड ऑफ सेंटेन्स’ने बाजी मारली आहे. दिल्ली नजीकच्या हापूर गावातील एका महिलेची कहाणी असलेल्या ‘पीरियड एंड ऑफ सेंटेन्स’ या लघुपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मासिक पाळीसाठी ज्यांना पॅड उपलब्ध होत नाहीत अशा हापूर गावातील महिलांची कहानी या लघुपटात मांडली आहे. रायका झेहताब यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटरमध्ये हा ऑस्कर पुरस्कार सोहळा रंगला.

आपली प्रतिक्रिया द्या