हिंदुस्थानची वन डे रँकिंगमध्ये घसरण

आयसीसीकडून ताजी रँकिंग सोमवारी जाहीर करण्यात आली. हिंदुस्थानचा क्रिकेट संघ टी-20 रँकिंगमध्ये दुसऱया स्थानावर कायम आहे. पण वन डे रँकिंगमध्ये टीम इंडियाची तिसऱया स्थानावर घसरण झाली आहे. केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाने वन डे क्रमवारीत वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडला मागे टाकत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.

कसोटीतील रँकिंग नंतर अपडेट होईल

सध्या आयसीसीच्या कसोटी रँकिंगमध्ये हिंदुस्थानचा संघ पहिल्या स्थानावर विराजमान आहे; पण कसोटी रँकिंग अजून अपडेट करण्यात आलेली नाही. पाकिस्तान-झिम्बाब्वे यांच्यामध्ये सुरू असलेल्या मालिकेनंतर यामध्ये अपडेट करण्यात येणार आहे.

विल्यमसनची ब्रिगेड टॉपवर

हिंदुस्थानचा क्रिकेट संघ वन डे क्रमवारीत तिसऱया स्थानावर घसरला आहे. याचप्रसंगी केन विल्यसमनचा न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडने कोरोनाच्या काळात पार पडलेल्या मालिकेत बांगलादेशला 3-0 अशी धूळ चारली होती. याच जोरावर त्यांना आगेकूच करता आली आहे.

पाच रेटिंगने मागे

आयसीसीच्या टी-20 रँकिंगमध्ये इंग्लंड पहिल्या स्थानावर आहे. हिंदुस्थान दुसऱया स्थानावर आहे. इंग्लंडकडे 277 आणि हिंदुस्थानकडे 272 रेटिंग आहे. दोन संघांमध्ये पाच रेटिंगचा फरक आहे. न्यूझीलंडचा संघ तिसऱया, पाकिस्तानचा संघ चौथ्या व ऑस्ट्रेलियाचा संघ पाचव्या स्थानावर विराजमान आहे.

आयसीसी संघांची क्रमवारी

कसोटीतील अव्वल पाच संघ

हिंदुस्थान – 120 रेटिंग
न्यूझीलंड – 118 रेटिंग
ऑस्ट्रेलिया – 113 रेटिंग
इंग्लंड – 106 रेटिंग
पाकिस्तान – 90 रेटिंग

वन डेतील अव्वल पाच संघ

न्यूझीलंड – 121 रेटिंग
ऑस्ट्रेलिया – 118 रेटिंग
हिंदुस्थान – 115 रेटिंग
इंग्लंड – 115 रेटिंग
दक्षिण आफ्रिका – 107 रेटिंग

टी-20तील अव्वल पाच संघ

इंग्लंड – 277 रेटिंग
हिंदुस्थान – 272 रेटिंग
न्यूझीलंड – 263 रेटिंग
पाकिस्तान – 261 रेटिंग
ऑस्ट्रेलिया – 258 रेटिंग

आपली प्रतिक्रिया द्या