हिंदुस्थानी थाळी सर्वात आरोग्यदायी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्याच्या  धावपळीच्या युगात खासकरून तरुणाई फास्ट फूडच्या आहारी गेली आहे. फास्ट फूडच्या अतिसेवनामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतेय. या पार्श्वभूमीवर आपल्या दैनंदिन आहारात प्रथिनांचा पुरेसा समावेश करण्याचा प्रयत्न म्हणून ‘हमारी प्रोटिन थाली’ या उपक्रमाची घोषणा झाली.

या उपक्रमाला ‘पोल्ट्री ढाबा’चे पाठबळ आणि यूएसएसईसीचे सहाय्य लाभले आहे. उपक्रमामध्ये देशाच्या प्रत्येक राज्यातील 28 चविष्ट व सर्वांगीण तसेच समतोल आहाराला पूरक अशा थाळ्या सादर करण्यात आल्या. एनएसआयच्या डॉ. सुभद्रा मांडलिक म्हणाल्या, हिंदुस्थानी अन्न हे निरोगी तर आहेच, पण ते अत्यंत चविष्ट व लाभांनी समृद्ध आहे. फक्त दररोजच्या जेवणात छोटे बदल केले तर आपण आपले पोषण सुधारू शकतो. जेवणामध्ये डाळी, सोयाबीन, अंडी, चिकन, शेंगदाणे यांचा समावेश आवश्यक आहे. दररोजच्या जेवणात 25 टक्के प्रथिने असणे गरजेचे आहे. पोषक आहाराबाबत जागरुकता करणे हा थाळी या संकल्पनेचा उद्देश आहे.