हिंदुस्थानी मल्लांची सर्वोत्तम कामगिरी, आशियाई स्पर्धेत 20 पदकांची लयलूट

194

नवी दिल्ली येथील खाशाबा जाधव इनडोअर स्टेडियममध्ये पार पडलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत हिंदुस्थानी मल्लांनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवत एकूण 20 पदकांची लयलूट केली.स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जितेंदरने पुरुष फ्रीस्टाईल गटाच्या 74 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले.तर 2018 च्या राष्ट्रकुल विजेत्या राहुल आवारेने 61 किलो गटात दास्तान माजी अल्मानला अस्मान दाखवत कास्यपदक पटकावले.हिंदुस्थानसाठी आजचे दुसरे कास्यपदक फ्रीस्टाईल कुस्तीच्या 86 किलो वजनी गटात दीपक पुनियाने पटकावले .त्याने इराकच्या इसा अब्दुमसलामचा 10-0 असा एकतर्फी पराभव केला.

हिंदुस्थानच्या मल्लांनी ग्रीको रोमन प्रकारात 1 सुवर्णपदक आणि 4 कास्यपदके,फ्रीस्टाईल प्रकारात 1 सुवर्ण, 4 रौप्य व 2 कांस्यपदकाची कमाई केली.तर महिला कुस्तीत हिंदुस्थानी कुस्तीगीरांनी 3 सुवर्ण,2 रौप्य आणि 3 कास्यपदके पटकावली.

जितेंदरचे सुवर्णपदक हुकले
फ्रीस्टाईल कुस्तीत 74 किलो वजनी गटात ऑलिम्पिअन सुशीलकुमारला उपांत्य फेरीत पराभूत करणाऱ्या जितेंदरने अंतिम लढतीत कझाकस्थानच्या कैसानॉव्ह डॅनियरला स्तुत्य लढत दिली.पण अनुभवी कझाक मल्लाने अखेर 3-1 अशी बाजी मारत सुवर्णपदक पटकावले.जितेंदरने सुशीलकुमारला पराभूत करीत सुशीलचे टोकियो ऑलिम्पिक पात्रतेचे स्वप्न धुळीस मिळवले आहे

आपली प्रतिक्रिया द्या