पंतप्रधान कार्यालयाचा नवीन पत्ता ‘सेवातीर्थ’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सेवातीर्थ या भव्य नवीन इमारत संकुलाचे उद्घाटन केले. आजपासून पंतप्रधान कार्यालय (PMO) या नवीन वास्तूतून आपले कामकाज सुरू करणार आहे. यामुळे आता देशाचे ‘पॉवर सेंटर’ बदलले असून प्रशासकीय कामांना नवी दिशा मिळणार आहे.

सेवातीर्थ संकुलात आता पंतप्रधान कार्यालयासोबतच राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (NSCS) आणि कॅबिनेट सचिवालय देखील एकाच छताखाली आले आहेत. ही नवीन इमारत ओपन फ्लोअर मॉडेलवर आधारित असून ती डिजिटल तंत्रज्ञानाने सज्ज आहे. तसेच ४-स्टार GRIHA मानांकनानुसार पर्यावरणपूरक पद्धतीने तिची निर्मिती करण्यात आली आहे.