
हिंदुस्थानात पहिली हायड्रोजन ट्रेन शुक्रवारी धावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन जींद ते सोनीपत या मार्गावर धावणार आहे. देशात पहिल्यांदाच हायड्रोजन ट्रेन धावली असून हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या ट्रेनचा हिंदुस्थान हा पाचवा देश ठरला आहे. याआधी जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीनमध्ये हायड्रोजनवर ट्रेन धावत आहेत.
जींद-सोनीपत मार्गावर धावणारी ही ट्रेन एकूण 10 डब्यांची आहे. यात 8 डबे हे प्रवाशांसाठी असून 2 डबे हे इंजिनासाठी आहेत. ही ट्रेन एकूण 14 स्थानकांदरम्यान धावणार असून जास्तीत जास्त 75 किमी ताशी वेगाने धावेल. ही ट्रेन 89 किलोमीटरचा प्रवास दोन तासांत पूर्ण करेल. या ट्रेनचे भाडे सुरुवातीला 5 ते 25 रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहे. जिंद रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या हायड्रोजन ट्रेनला फुलांनी सजवण्यात आले आहे.
ट्रेनची वैशिष्ट्ये
डिझाइन वेग 110 ताशी, तर कार्यरत वेग 75 किमी ताशी, प्रवासी क्षमता 682 सीट्स, एकूण 2 हजार 600 प्रवासी प्रवास करू शकतील. एकूण 10 कोच, त्यातील 8 प्रवासी तर 2 डबे पॉवर कार. एकदा इंधन भरल्यानंतर 356 किमीपर्यंत प्रवास इंजिनमधून धुराऐवजी केवळ वाफ बाहेर येईल.


























































