
अहमदाबादची कंपनी अजिस्टा इंडस्ट्रीजने अंतराळात एका सॅटेलाइटने आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरचा फोटो काढून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या सॅटेलाइटने 300 किलोमीटर अंतरावरून अंतराळाचा स्पष्ट फोटो काढला आहे. या कामगिरीमुळे हिंदुस्थानची ‘स्पेस सिच्युएशनल अवेयरनेस’ क्षमता नक्कीच वाढली आहे. जी अंतराळात हिंदुस्थानी सॅटेलाइट्सची देखरेख आणि सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण मानली जाते.
अजिस्टा इंडस्ट्रीजने ट्रकिंग टेक्नोलॉजी डेव्हलप केली आहे. यामुळे अंतराळातील एका कक्षेत दुसरे सॅटेलाईट किंवा स्पेस स्टेशनवर नजर ठेवली जाऊ शकते. कंपनीकडून डेव्हलप करण्यात आलेल्या एका छोटय़ा सॅटेलाइटने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा स्वच्छ फोटो घेतला आहे. पृथ्वीची प्रदक्षिणा लावत असताना हा फोटो काढला आहे. एखाद्या खासगी हिंदुस्थानी कंपनीने अशी कामगिरी पहिल्यांदा केली आहे. यामुळे हिंदुस्थानसाठी सुरक्षा आणि अंतराळात सॅटेलाईटला कोणत्याही धोक्यापासून किंवा स्पेस डेब्रिसपासून वाचवण्यासाठी एक मोठी कामगिरी मानली जात आहे.


























































