
हिंदुस्थानी लष्कराची आधुनिक ताकद आणखी वाढली आहे. देशात बनवत असलेल्या कामिकाजे ड्रोनची संख्या आता वाढली असून एक हजाराहून अधिक ड्रोन हिंदुस्थानी लष्कराच्या ताफ्यात आले आहेत.
स्वदेशी जेएम-1 लायटरिंग म्यूनिशन ड्रोनची तिसरी खेप हिंदुस्थानी लष्कराकडे सोपवली आहे. ही डील आपत्कालीन खरेदी प्रक्रियांतर्गत करण्यात आली आहे. आतापर्यंत जॉननेट टेक्नोलॉजीजने हिंदुस्थानी लष्कराला एक हजाराहून अधिक ड्रोन दिले आहेत. या ड्रोनचा वापर वेगवेगळ्या परिसरात ऑपरेशनमध्ये केला जात आहे. जेएम-1 कामिकाजे ड्रोनने ‘ऑपरेशन सिंदूर’वेळी आपली पॉवर दाखवली होती. या ड्रोनने शत्रूंच्या ठिकाणावर थेट आणि अचूक हल्ला केला होता. या ड्रोनची झलक नुकत्याच झालेल्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्येही दिसली होती.
या ड्रोनला हिंदुस्थानी लष्कराच्या स्पेशल फोर्सेजने कर्तव्य पथावर प्रदर्शित केले होते. या ड्रोनमध्ये 80 टक्क्यांहून अधिक स्वदेशी उपकरणाचा वापर करण्यात आला आहे. हे ड्रोन 18 हजार उंच फुटावर यशस्वीपणे काम करू शकतात. डोंगराळ आणि सीमावर्ती भागात हे चांगले काम करतात.




























































