
नवी मुंबईहून श्रीनगरला पोहोचलेले इंडिगोचे 6ई 225 हे विमान पार्क करत असताना विमानतळावरील एका खांबाला धडकले. सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित आहेत. कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. या घटनेच्या कारणांची चौकशी सुरू आहे.

























































