एअर इंडियानंतर मुंबईहून इंडिगोच्या विमानाला बॉम्बची धमकी

indigo

मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर इंडिगोला देखील अशाप्रकारचा एक फोन आला. टेकऑफच्या काही मिनिटांपूर्वीच बॉम्बने उडवण्याची धमकी इंडिगोला देण्यात आली.

मुंबईहून मस्कतला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E 1275 या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. प्रोटोकॉलप्रमाणे, विमान एका खासगी ठिकाणी नेण्यात आले असून विमानाचा तपास केला जात आहे.

एअर इंडियाचे विमान दिल्लीकडे वळवण्यात आल्यानंतर अगदी काही तासांतच इंडिगोला ही धमकी आली. मुंबई विमानतळाला “X” वर हि धमकी देण्यात आली. या बाबत एएनआय वृत्तसंस्थने माहिती दिली.

इंडिगोचे विमान सध्या IGI विमानतळावर उभे असून विमानातील प्रवासी आणि क्रू मेंमबर्सना, सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तसेच विमानतळावरील सर्व सुरक्षा यंत्रणा देखील सतर्क आहेत.