एअर इंडियाऐवजी इंडिगो चांगला पर्याय! लिलावाबाबत एअर कतार उदासीन

501

कोटय़वधींच्या कर्जाच्या खाईत असलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला खरेदी करण्यात आम्हाला मुळीच रुची नाही. एअर इंडियापेक्षा इंडिगो विमान कंपनी खरेदीसाठी चांगला पर्याय असल्याचे एअर कतारने म्हटले आहे.

एअर इंडियावर 58 हजार कोटींचे कर्ज आहे. दिवाळीखोरीत बाहेर पडण्यासाठी सरकारने कोणतेही पॅकेज जाहीर न करता ही सरकारी विमान कंपनी विकण्याचे ठरवले आहे. त्या पार्श्वभूमीवर, एअर कतार एअर इंडिया खरेदीसाठी बोली लावू शकेल, असे म्हटले जात आहे. मात्र, एअर इंडिया खरेदीत रुची नसल्याचे आज कतारने स्पष्ट केले. कतार एअरवेजचे सीईओ अकबर अल बाकर यांनी इंडिगोमध्ये हिस्सेदारी खरेदी करू, पण त्यासाठी वेळ लागेल. सध्या या कंपनीच्या प्रमोटर्समध्ये काही मतभेद आहेत. ते दूर झाले, की, इंडिगो खरेदीसाठी प्रयत्न करू, अशी माहिती बाकर यांनी दिली. एअर कतारने आज इंडिगोबरोबर एक करार केला. या करारानुसार, इंडिगोच्या काही हवाई मार्गांवर कतार एअरवेजची विमाने उडणार आहेत. त्याचे बुकिंग कतार करणार आहे.

 लंडन आणि सिंगापूरमध्ये रोड शो
दोन वेळा लिलावाला प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता एअर इंडियाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी केंद्र सरकारने लंडन आणि सिंगापूरमध्ये रोड शोचे आयोजन केले आहे. एअर इंडिया कंपनी खरेदी केली जावी, यासाठी गेले अनेक महिने केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, ही कर्जबाजारी कंपनी खरेदी करण्यासाठी आतापर्यंत कोणीही पुढे आलेले नाही.

 

आपली प्रतिक्रिया द्या