
एअर इंडिया कंपनीत मिळणाऱया घसघशीत पगारवाढीसाठी काही दिवसांपूर्वी पायलट आणि केबिन क्रूने सामूहिक रजेवर गेले असताना आता कमी पगारवाढ झाली नाही म्हणून इंडिगोचे नाराज झालेले टेक्निकल वर्गाचे कर्मचारी सुट्टीवर गेले आहेत. दिल्ली आणि हैदराबादमधील विमानांची देखभाल करणाऱया कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे. मात्र याचा इंडिगोच्या विमान सेवेवर अजूनही कोणताही परिणाम झालेला नाही.
हिंदुस्थानींना देशांतर्गत माफक दरात हवाई सेवा देणारी इंडिगो विमान कंपनी सध्या मोठय़ा स्थित्यंतरामधून जात आहे. इंडिगेचे सीईओ रोनोजॉय दत्ता आणि चीफ कमर्शिअल अधिकारी विली बॉल्टर यांच्यासहित काही वरिष्ठ अधिकाऱयांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे सध्या इंडिगोच्या सीईओ पदाचा कारभार केएलएम रॉयल डच एअरलाइन्सचे अध्यक्ष आणि सीईओ पीटर एल्बर्स यांनी स्वीकारला आहे. शुक्रवारी दिल्ली आणि हैदराबादमधील कर्मचारी रात्रपाळीसाठी कार्यालयात रिपोर्टिंगला पोहोचले नव्हते, असे उघड झाले आहे. त्यामुळे येत्या काळात इंडिगो कर्मचाऱयांच्या पगाराचा तिढा आणखी गुंतागुंतीचा होणार आहे.

























































