देशातील आजची परिस्थिती ‘श्री 420’ सिनेमासारखी!

572

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी एकापाठोपाठ एक उघडकीस येणाऱ्या बँक घोटाळ्यांवर ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. देशाची आजची परिस्थिती पाहून मला वडिलांचा ‘श्री 420’ सिनेमा आठवतोय, असे ट्विट ऋषी कपूर यांनी केले आहे.

को-ऑपरेटिव्ह सोसायटय़ा आणि बँकेत घोटाळे होतायत. भ्रष्टाचाऱयांनी अक्षरशः बाजार मांडला आहे. अशा भ्रष्टाचाऱयांना वेळीच धडा शिकवून सत्याच्या मार्गाने जगणाऱया सर्वसामान्यांना त्यांचा हक्क दिला पाहिजे याकडे सरकारने लक्ष द्यावे, असेही ट्विटमध्ये ऋषी कपूर यांनी म्हटले आहे. कर्करोगावर यशस्वीरीत्या मात केल्यानंतर काही दिवसांपूर्वीच ऋषी कपूर हिंदुस्थानात परतले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून समाजात घडणाऱया घटनांवर ते नेहमी भाष्य करताना दिसतात.

आपली प्रतिक्रिया द्या