
मुलांच्या मानसिक आरोग्याचे रक्षण आणि सायबर सुरक्षिततेसाठी इंडोनेशिया 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वापरावर अधिकृतपणे बंदी घातली आहे. असा कठोर निर्णय घेणारा इंडोनेशिया दक्षिण-पूर्वी आशियातील पहिला देश ठरला आहे. हा नवीन नियम आजपासून लागू करण्यात आला असून नियमांचे उल्लंघन करणा-या प्लॅटफॉर्मवर इंडोनेशिया सरकारकडून कडक दंडात्मक कारवाई किंवा थेट बंदी घातली जाणार आहे. या नवीन नियमांनुसार, 16 वर्षांखालील मुलांना फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक, यूटयूब आणि एक्स यांसारख्या प्लॅटफॉर्मवर स्वतःचे खाते उघडता येणार नाही.




























































