भयंकर! डॉक्टरांनी महिलेच्या गुप्तांगातून काढलं बाईकचं हॅण्डल

55

सामना ऑनलाईन । इंदूर

इंदूरमधील चंदन नगरमध्ये एका नराधमाने त्याच्या पत्नीच्या गुप्तांगात बाईकचे हॅण्डल टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जवळपास आठ महिने ते हॅण्डल महिलेच्या गुप्तांगाच्या वर छोट्या आतड्यामध्ये अडकलेले होते. नुकतंच डॉक्टरांनी त्या महिलेवर ऑपरेशन करून हॅण्डल काढले आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या महिलेच्या पतीला अटक केली आहे.

आठ महिन्यांपूर्वी पीडित महिलेचे पती सोबत भांडण झाले होते. त्यानंतर पतीने सेक्सच्या वेळी तिच्या गुप्तांगात बाईकचे हॅण्डल घुसवले. त्यावेळी लाजे खातर त्या महिलेने ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही. मात्र त्यानंतर तिच्या पोटात दुखायला लागले. तिने अनेक दिवस ते दुखणे अंगावर काढले. अखेर काही महिन्यांनी ती डॉक्टरकडे गेली तिथे सोनोग्राफी केली असता त्यातही डॉक्टरांना काहीच दिसले नाही. मात्र जेव्हा डॉक्टरांनी त्या महिलेचे सीटीस्कॅन केले. त्यात तिच्या छोटे आतडे व गर्भपिशवी व मूत्रपिंडाच्या मध्ये काहीतरी अडकले असल्याचे दिसले. त्यानंतर डॉक्टरांनी तिचे ऑपरेशन करून जेव्हा ती वस्तू बाहेर काढली त्यावेळी त्यांना धक्काच बसला. ती वस्तू बाईकचे हॅण्डल होते व ते हॅण्डल तब्बल आठ महिने बाईच्या शरीरात होते.

याप्रकरणी महिलेने तिचा नवरा प्रकाश बंबई याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिच्या नवऱ्याला अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या