
महाराष्ट्रातील उद्योग तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. मराठवाडय़ासारख्या संघर्षमय भूमीतून आलेले भरत गीते यांनी जर्मनीतील ज्ञान मिळवून शून्यातून उभारलेला तौरल इंडियासारखा प्रकल्प आजच्या तरुणांसाठी आदर्श आणि प्रेरणा देणारा ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
पुण्यातील चाकण येथील अॅल्युमिनियम सँड-कास्टिंग उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य तौरल इंडियाच्या प्रगत उत्पादन प्रकल्पाला भेट दिली पवार यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी प्रकल्पाचा आढावा घेतला आणि टीमसोबत संवाद साधला. पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक, कौशल्यविकास सक्षण करणे आणि फाऊंड्री संस्पृतकीतील उत्पृष्ट पद्धती स्वीकारणे, नाविन्यतेला चालना देणे हे चर्चेचे मुख्य विषय होते. दरम्यान, शरद पवार यांची उपस्थिती ही आम्हा सर्वांसाठी उर्जा आणि प्रेरणेचा स्रोत आहे, आजचा दिवस तौरल इंडियाच्या इतिहासातील उत्सवाचा क्षण आहे, असे तौरल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते म्हणाले.