पुण्यात घोरपडीतील कचरा कुंडीत आढळले अर्भक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील घोरपडी बाजार परिसरातील कचराकुंडीत पुरूष जातीचे अर्भक फेकून दिल्याची घटना 30 जूनला उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधातून अर्भक जन्मले असल्याने त्याला फेकून दिल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी महिला या कॉन्टोन्मेंटमध्ये साफसफाई करण्याचे काम करतात. 30 जूनला सकाळी सातच्या सुमारास घोरपडी बाजार परिसरातील कचराकुंडीत त्यांना एक अर्भक रडत असल्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी कुंडीत पाहिले असता, अर्भक आढळून आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी वानवडी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन अर्भकाला उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल केले आहे.